News Flash

Video : ‘दृष्टी’ आणि ‘कोन’मध्ये दूरसंवादमालेत अमित देशमुख यांच्याशी संवाद

महाराष्ट्र राज्याच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त 'लोकसत्ता'ने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ दूर-संवादमाला आयोजित केली आहे...

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेतील आज अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मालिकेत आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संवाद साधला. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला आयोजित करण्यात आली आहे.

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिले. या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या कार्यक्रमात घेतला जात आहे.

वेळापत्रक :-
४ जून: विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
५ जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रायोजक
* प्रस्तुती : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
* सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 4:58 pm

Web Title: loksatta drusthi ani kon with congress leader amit deshmukh scsg 91
Next Stories
1 रुग्णांवर चाचणी करण्यास परवानगी देऊ शकत नाही; ‘पीएम केअर्स’मधील व्हेंटिलेटर्सवरून उच्च न्यायालयाने फटकारलं
2 Maharashtra Unlock : राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा!
3 मोठी बातमी…राज्यातल्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द!
Just Now!
X