विकासाचं राजकारण आणि निवडणूक केंद्री राजकारण हा मुद्दा सातत्याने चर्चिला जातो. हाच मुद्दा समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाशिक महापालिकेतही काम केलं. मात्र, तरीही नाशिका महापालिकेत मनसेला मतदारांनी नाकारलं. या विषयावर बोलताना राज ठाकरे यांनी विकासाच्या राजकारणाबद्दल लोकांच्या उदासिनतेबद्दल नाराजी व्यक्त केली. “समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ आहे,” असं म्हणत राज ठाकरे यांनी भूमिका मांडली.

“महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती आणि भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबिनारमध्ये महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कुठल्याही एका विचारांशी प्रामाणिक असाल, तेव्हा त्या गोष्टींना यश येत नाही. पण कालांतराने यश मिळतं, कारण त्या गोष्टीं समाजाला पटायला लागतात. एखाद्याने आयसाँग चालवलं म्हणून आपणही लावलं पाहिजे असं नाही. भूमिकेशा ठाम राहिलं की, लोकांना त्या गोष्टी कालांतराने पटतात. यश मिळतं. महाराष्ट्राचा विकास आराखडा जाहीर केला. षण्मुखानंद सभागृहात तो कार्यक्रम होता. पण त्याचवेळी शिवसेना-भाजपाची युती तुटली. त्यामुळे सगळा फोकस तिकडे गेला. कारण इथे विकासाशी कुणालाच काही घेणंदेणं राहिलेलं नाही. विकास आराखड्याकडे दुर्लक्ष झालं. आता त्यात काही बदल करावे लागतील. कारण परिस्थिती बदलली आहे,”असं राज ठाकरे म्हणाले.

आता बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो; राज ठाकरे केंद्रावर संतापले

विकासाचा प्रश्न आणि राजकारणाचा संबंध नाही, असं वाटतं का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मला पण हाच प्रश्न पडला आहे. कारण नाशिक शहरासंदर्भात मी एक स्वप्न बघितलं. नाशिकमध्ये डागडुजी केली नाही. पाण्याचा प्रश्न सोडवला. नाशिक खड्डेमुक्त केलं. त्या काळात झालेल्या गोष्टी लोकांनाही अपेक्षित नव्हतं. अनेक उद्योगपतींना नाशिकमध्ये बोलावलं. त्या शहरात विकासकामं केली. त्या पाच वर्षात नाशिक महापालिका ही एकमेव महापालिका होती की, त्या काळात विरोधकांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. पण ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यात विकासाचा संबंधच नव्हता. मग मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचं असेल, तर हा विकास हवा कशाला. समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ आहे,” असं म्हणत राज ठाकरे यांनी लोकांच्या विकासाच्या राजकारणबद्दलच्या उदासिनतेवर नाराजी व्यक्त केली.