राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि आपल्यात कोणतेच मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत बोलताना सुळे यांनी पवार कुटुंबाची राष्ट्रवादीत मत्तेदारी नसल्याचंही स्पष्ट केलं.

अजित दादा आणि सुप्रिया ताई यांचा ताळमेळ कसा लावावा?, सुप्रियाताई आणि अजितदादांचं फारसं चांगलं नाही असं लोकांना खूप आवडतं चर्चा करायला. त्यावर तुम्हाला भाष्य करायचं झाल्यास काय म्हणाल, असा प्रश्न ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सुप्रिया सुळेंना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया यांनी, “एक तर हे खूप हस्यास्पद आहे. खूप गुळगुळीत विषय आहे हा. मागच्या १४ वर्षांपासून मी खासदार आहे पण कुठल्या धोरणांवर दादाचं आणि माझं वेगळं मत आहे ही चर्चा कुणी पाहिलेलीय, बघितलीय याचा काही डेटा नाहीय. दादाचं आणि माझं वेगळं मत आहे पण कोणत्या गोष्टीवर याला काही डेटा उपलब्ध नसून एकाच विषयाचं गॉसिप किती दिवस करणार?” असा प्रश्न उपस्थित केला.

Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

पुढे बोलताना सुप्रिया यांनी अजित पवार यांचा अनुभव माझ्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं. “एक तर तो माझा मोठा भाऊ आहे. तो माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठाय. अनुभव, प्रशासनातील काम त्याचं माझ्यापेक्षा जास्त आहे,” असं सुप्रिया म्हणाल्या. पुढे बोलताना सुप्रिया यांनी उदाहरण देत, मी कधी त्याच्या कार्यालयात गेल्यावर तो मला, “रेल्वेचं काम पूर्ण नाही झालं कधी करणार आहेत फोन लाव त्या मंत्र्याला आणि पूर्ण करुन घे काम”, असं सांगतो. तर आम्ही एक टीम म्हणून काम करतो, असं सुप्रिया यांनी स्पष्ट केलं. तसेच इतर राजकीय कुटुंबांमध्ये काही झालं तर आमच्याकडे झालं पाहिजे असं आहे का?, असा उलट प्रश्न सुप्रिया यांनी भावा बहिणीमध्ये वाद असल्याची चर्चा करणाऱ्यांना विचारला. दादा आणि मी, आम्हाला अमुक पद पाहिजे इतक्या कोत्या मनोवृत्तीने आम्ही कधीच विचार करत नाही, असंही सुप्रिया म्हणाल्या. पुढे बोलताना सुप्रिया यांनी ५५ वर्षांपासून अनेक कार्यकर्ते, कुटुंबांनी शरद पवारांसोबत संघर्ष केलाय. त्यामुळे या पक्षातील भागिदार ही आमची जबाबदारी आमची नाहीय का? एका संघटनेत काम करतो तेव्हा केवळ मी, मला, माझं असा विचार करता येऊ शकत नाही, असंही सांगितलं.

आणखी वाचा- तू राजकारणाच्या फंद्यात पडू नकोस असं कधी आई-वडिलांनी सांगितलं का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

वैयक्तिक महत्वकांशांमुळे काहीजणांचा गोंधळ होऊ शकतो. पण माझ्यात आणि दादामध्ये कोणतेही मतभेद नाहीय. आता आम्हाला या वयात समज नसेल तर शेम ऑन अस, असं म्हणत सुप्रिया यांनी आपलं मत मांडलं.

तसेच पुढे बोलताना, पवार कुटुंबाची मत्तेदारी होऊ शकतं नाही. ते चुकीचं ठरेल असं सुप्रिया म्हणाल्या. विचारांची नाळ ही यशवंतराव चव्हाणांपासून आहे. आजही मानसपुत्र म्हणून पवारसाहेबांना ओळखलं जातं. आमच्या पक्षात चांगलं टॅलेंट पूल आहे, असं सुप्रिया यांनी सांगितलं.

प्रायोजक
* प्रस्तुती : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
* सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.