आपल्याला नायक का लागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधत आणि सामाजिक चळवळींच्या राजकीय परिणामांचा अन्वयार्थ लावत लोकसत्ता वक्तृत्व स्पध्रेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीला बुधवारी प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या स्पध्रेत पहिल्या दिवशी नागपूर शहरातील ८० विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व कला सादर केली.
स्पध्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे २१ व २२ हे दोन दिवस नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी घेतली जाणार आहे.
बुधवारी पहिल्या दिवशी नागपूर शहरातील स्पर्धकांनी विविध विषयांवर आपली मते जोरकसपणे मांडली. नाथे समूह प्रस्तुत तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळ, पृथ्वी एडिफाईस व जनकल्याण सहकारी बँक यांच्या साहाय्याने ही स्पर्धा होत आहे.
आपल्याला नायक का लागतात?, सामाजिक चळवळीचा राजकीय परिणाम, अतिसंपर्काने काय साध्य?, जगण्याचे मनोरंजनीकरण व जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत? या विषयांवर स्पर्धकांनी आपली मते मांडली.