कोकण विभागाची प्राथमिक फेरी आज रत्नागिरीत

गावच्या जत्रेत रात्र रात्र जागवणारे दशावतारी आणि त्या गोष्टीत रंगून पहाटेपर्यंत आवडीने नाटक पाहणारे गावकरी.. कोकणातील नाटय़वेडाचे वर्णन करावे तेवढे थोडे! गावच्या जत्रेला खास हुंबयहून डायरेक्टर आणून नाटके करणाऱ्या कोकणी माणसांच्या या वेडालाच खतपाणी घालणाऱ्या आणि लाल मातीत, माड-पोफळीच्या सावलीत बहरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवारी रत्नागिरीत पार पडणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शनचे प्रतिनिधी या प्राथमिक फेरीसाठी उपस्थित असतील. ही प्राथमिक फेरी रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात होणार आहे.

गेल्या वर्षी कोकण विभागातील चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाची ‘कबुल है’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दुसरी आली आणि या विभागातील सर्वच महाविद्यालयांचा उत्साह वाढला. यंदा इतर विभागांना मागे टाकत कोकण विभागातील एकांकिकेलाच महाराष्ट्राची लोकांकिका बनवण्याच्या ध्यासाने तब्बल ११ महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या ११ महाविद्यालयांमधील प्रतिभावान तरुणांना व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रात संधी देण्यासाठी आयरिस प्रॉडक्

शनचे मनीष दळवी आणि अजिंक्य जोशी हे दोन प्रतिनिधी रत्नागिरीच्या प्राथमिक फेरीसाठी उपस्थित असतील. आयरिस प्रॉडक्शनचे क्रीएटीव्ह प्रमुख असलेल्या मनीष दळवी यांनी ‘लुखा छुपी’ या नाटकाची निर्मिती केली आहे, तर ‘दुनियादारी’ या चित्रपटातून आणि इतर मराठी व हिंदी मालिकांमधून झळकलेले अजिंक्य जोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा राज्यभरात आयोजित करण्यासाठी अस्तित्त्व या संस्थेची मोलाची मदत लाभली आहे. तसेच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम पाहणार आहेत. यंदा या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल हेदेखील सहभागी झाले आहेत.

रत्नागिरी केंद्रावर सादर होणाऱ्या एकांकिका

’ गोगटे-जोगळेकर महाविद्यालय – भोग

’ कुलकर्णी-अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालय – गोष्ट एका अर्जूनाची

’ नवनिर्माण महाविद्यालय – गिमिक

’ एमकेएसएस कॉलेज ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन – लपंडाव

’ मत्स्य महाविद्यालय – दोन दोन वाघीण

’ डीबीजे महाविद्यालय – अपूर्णाक

’ राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग – मिशन १०८

’ बापट कनिष्ठ महाविद्यालय – लेक झाली नकोशी

’ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, ओरस – संजीवनी

’ एस. के. पाटील सिंधुदुर्ग वरिष्ठ महाविद्यालय  फ्लाइंग क्वीन्स

छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज – शुभयात्रा