News Flash

रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी आज

स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात उद्या दुपारी साडेतीन वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे.

रत्नागिरी : राज्यभरातील युवा पिढीच्या सुप्त कलागुणांच्या आविष्कारासाठी व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची  रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी आज,(१२ डिसेंबर) येथाील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात रंगणार आहे.

या विभागातील स्पर्धेची प्राथमिक फेरी गेल्या शनिवारी (७ डिसेंबर) येथे पार पडली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधील महाविद्यालयांच्या संघांनी त्यामध्ये भाग घेतला. त्यातून आज (१२ डिसेंबर) होत असलेल्या विभागीय अंतिम फेरीसाठी ५ महाविद्यालयीन संघांची निवड करण्यात आली.

या पाच एकांकिकांपैकी चार एकांकिकांमध्ये वास्तववादी सामाजिक विषयांची प्रभावीपणे मांडणी करण्यात आली आहे.

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात उद्या दुपारी साडेतीन वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. विभागीय अंतिम फेरीतील प्रथम क्रमांकाचा संघ मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.  त्यामुळे त्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी या पाचही संघांमध्ये चांगलीच चुरस राहील, अशी अपेक्षा आहे.

विभागीय अंतिम फेरीतील एकांकिका

* अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी, एकांकिका- ‘गावपळण’

* गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी, एकांकिका- ‘ऑफबीट’

* स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड जि. सिंधुदुर्ग, एकांकिका – ‘हरवतंय काही तरी’

* एस. पी. हेगशेटय़े महाविद्यालय, रत्नागिरी, एकांकिका – ‘वन डे सेलिब्रेशन’

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, जि. रायगड, एकांकिका – ‘निबंध’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:02 am

Web Title: loksatta lokankika division final today in ratnagiri zws 70
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले, हा काळानं घेतलेला सूड -संजय राऊत
2 संजय राऊत म्हणाले, गृहखातं शिवसेनेकडं राहणार आणि मुख्यमंत्र्यांकडेच राहणार
3 “मी भाजपा सोडते आहे, या वावड्या कुठून आल्या?”
Just Now!
X