जगण्याच्या सर्वस्पर्शी नाटय़ानुभवांची पर्वणी ठरणारी लोकसत्ता-लोकांकिकांची प्राथमिक फेरी पूर्ण झाली. पाच संघांची अंतिम विभागीय फेरीसाठी निवड करताना परीक्षकांनाही अक्षरश: कसरत करावी लागली. दोन दिवसांपासून १६ एकांकिकांमधून महाविद्यालयीन तरुणांनी सामाजिक समस्यांसह परस्पर सहबंधनातील नाटय़ संहिता रूपाने सादर केल्या.7lok5
नाटय़क्षेत्रात कलंदर आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व मानले जाणाऱ्या विनय आपटे यांना श्रद्धांजली वाहून ‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या दुसऱ्या दिवशीच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आणि सकस संहितांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. परीक्षकांसह स्पर्धकांनी या स्पर्धामुळे सकस नाटय़संहितांची पोकळी भरून निघेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडय़ात गारवा आहे. शहरात बाहेरगावाहून आलेल्या कलाकारांची वेगळी धांदल आणि शहरातील स्पर्धकांची वेगळीच ऊर्मी यामुळे दुसरा दिवस गाजला. सकाळच्या सत्रात सरस्वती नाटय़शास्त्र विभागाची ‘उद्घाटन’ ही एकांकिका सादर झाली. तर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाने 7lok4‘मसणातलं सोनं’ ही एकांकिका सादर केली. अण्णा भाऊ साठे यांची मूळ कथा असणाऱ्या या एकांकिकेने दिवस गाजवला. सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ‘ओपुन्शिया’, जालन्याच्या मत्स्योदरी महाविद्यालयाची ‘प्लीज फरगिव्ह मी’, अध्यापक महाविद्यालयाची ‘मेजवानी’, जळगावच्या डॉ. जी. पी. बेंडाळे महाविद्यालयाची ‘डू ऑर डाय’, केसीई महाविद्यालयाची ‘सिटी लाइट’, औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘फाशीचा दोर’, तर जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाने ‘सिम कार्ड’ ही एकांकिका सादर केली. प्रत्येक कलावंत मन लावून सादरीकरण करत होता. स्पर्धेत जिंकायच्याच तयारीने प्रत्येक जण उतरले होते. त्यामुळे अंतिम फेरीत पाच ज7lok3णांची निवड करताना परीक्षकांनाही कसरत करावी लागली. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अंतिम फेरीत कोण येणार, याची उत्सुकता स्पर्धकांना होती. परीक्षक अमेय उज्ज्वल आणि प्रा. योगिता महाजन यांनी दोन दिवसांतील एकांकिकांचे गुण निश्चित केले आणि ५ एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडल्या.
–चौकट–
मराठवाडय़ातील कलाकारांना लोकसत्ताने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ निश्चितपणे पुढे नेणारे आहे. या स्पर्धेमुळे सकस नाटय़परंपरा निर्माण होईल. नाटय़क्षेत्रातील स्पर्धासाठी माध्यमांकडून केला जाणारा हा प्रयत्न पोकळी भरून काढणारा आहे. स्पर्धेचे आयोजनही नीटनेटकेपणाने केलेले होते.
– परीक्षक अमेय उज्ज्वल
—-
प्राथमिक फेरीसाठी संहिता आणि अभिनय या निकषांना प्राधान्यक्रम देऊन घेण्यात आलेली ही स्पर्धा निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, अशीच आहे. कलाकारांनाही या स्पर्धेमुळे प्रोत्साहन मिळाले.
– प्रा. योगिता महाजन