08 March 2021

News Flash

विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक प्रश्न, चिंतांना आज पूर्णविराम!

लोकसत्ता आयोजित ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

वसईत लोकसत्ता आयोजित ‘मार्ग यशाचा’ कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन; सर्वाना विनामूल्य प्रवेश

असंख्य अभ्यासक्रम, अनेक शिक्षणसंधी, शिक्षण की नोकरी, चांगली पदवी अर्थात करिअर याविषयीची पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या प्रश्न आणि चिंतांना शनिवारी, ३ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्णविराम मिळणार आहे. लोकसत्ता आयोजित ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

वसई येथील विश्वकर्मा हॉल, वीर सावरकर नगर, आनंद नगर, वसई रोड (पश्चिम) या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता ही कार्यशाळा होत आहे.

शैक्षणिक वर्षांला जरी सुरुवात झाली असली तरी विद्यार्थी आणि पालकांच्या मनातले करिअर, शिक्षणविषयक प्रश्न काही संपलेले नाहीत. यंदा दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकालाच करिअरची चिंता सतावत असते. त्यांच्या पालकांचीही आपल्या पाल्याचे योग्य करिअर घडवण्याची धडपड सुरू असते. आज माहितीच्या महाजालामुळे माहितीचा खजिनाच उघडला गेला आहे.

असंख्य प्रकारचे अभ्यासक्रम आजकाल उपलब्ध आहेत. देशा-परदेशात अनेक शिक्षणसंधीही आहेत. परंतु त्यातील आपल्या पाल्यासाठी योग्य संधी कोणती हा प्रश्न पालकांना हमखास पडतो. त्याचसोबत करिअर निवडल्यानंतर पुढे काय, अधिक शिकावे की लगेचच नोकरीला सुरुवात करावी, कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घ्यावे, कोणत्या विद्यापीठातील पदवी अधिक चांगली असेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालक दोघांच्या मनात असतात. त्यासाठीच गरजेचे असते तज्ज्ञांचे मार्गदर्शन. म्हणूनच लोकसत्तातर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा घेतली जात आहे. तीही विनामूल्य.

करिअरची निवड हा करिअरचा पायाच असतो, तो भक्कम करण्याविषयी बोलणार आहेत, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी. ताण न घेता करिअरची निवड कशी करावी, पाल्याला करिअर निवडीत कशा प्रकारे साहाय्य करावे, याविषयी डॉ. शेट्टी बोलतील. तर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समधील करिअर आणि अभियांत्रिकीच्या वाटा या विषयाबद्दल मार्गदर्शन करतील, करिअर समुपदेशक विवेक वेलणकर. या तिन्ही क्षेत्रांतील करिअरच्या संधी, देशा-परदेशातील करिअरसंधी, अभियांत्रिकीचे भविष्य अशा अनेक मुद्दय़ांवर वेलणकर ते बोलतील.

या कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.

कधी?

शनिवार, ३ ऑगस्ट सायंकाळी ५.३० वाजता.

कुठे?

विश्वकर्मा हॉल, वीर सावरकरनगर, आनंदनगर, वसई रोड (पश्चिम)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:20 am

Web Title: loksatta marg yashacha organized in vasai abn 97
Next Stories
1 मृत्यूमार्गावरचा प्रवास
2 जयंती विशेष: क्रांतीसिंह नाना पाटील – संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार
3 शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्याची तयारी ठेवावी : चंद्रकांत पाटील
Just Now!
X