News Flash

#LoksattaPoll: ६५ टक्के वाचक म्हणतात, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरणाचा आग्रह योग्यच

शिवसेनेच्या मागणीला वाचकांचा पाठिंबा

शिवसेनेने केली आहे नामांतरणाची मागणी

देशात सध्या शहरांची नावं बदलली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं तर फैजाबादचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले. त्यानंतर शिवसेनेनेही महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने केलेली नामांतरणाची ही मागणी योग्य वाटते का यासंदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक वाचकांनी नामांतरणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे तर ३५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. एकंदरीतच मराठी वाचकांनी उत्तर प्रदेशात नामांतरण होऊ शकते तर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनेही या दोन शहरांची नावे बदलावीत या शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांना ‘औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर करण्याचा शिवसेनेचा आग्रह योग्य वाटतो का?’ असा प्रश्न फेसबुक तसेच ट्विटवर विचारण्यात आला. यामध्ये दोन्ही ठिकाणी एकूण २४०० हून अधिक लोकांनी आपली मते नोंदवली. त्यापैकी फेसबुकवर मत नोंदवलेल्या १ हजार ७०० हून अधिक वाचकांमधील ६५ टक्के म्हणजेच १ हजार १०० हून अधिक वाचकांनी ‘होय’ असे मत नोंदवत सेनेची नामांतरणाची मागणी योग्य असल्याचे मत नोंदवले. तर ६०२ वाचकांनी शिवसेनेच्या या मागणीशी आपण सहमत ‘नाही’ असे मत नोंदवले.

याच प्रश्नावर ट्विटवर एकूण ७८२ जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ५७ टक्के वाचकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला तर बाकी ४३ टक्के वाचकांनी शिवसेनेच्या मागणीला विरोध करत नाही असे उत्तर दिले.

काही दिवसापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरून औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्यावरून फडणवीस सरकारला प्रश्न विचारला होता.

वाचा सविस्तर > औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावं देवेंद्र फडणवीस कधी बदलणार?-शिवसेना

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला तो अंमलातही आणला मग हे देवेंद्र फडणवीस का करू शकत नाहीत? ‘योगी अदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले. अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार?’ असा सवाल राऊत आपल्या ट्विटमध्ये विचारला होता.

तर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही हीच मागणी लावून धरत शिवसेनेने खूप आधीपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याची मागणी होते आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात म्हणजेच आघाडी सरकारच्या काळात या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. आता या शहरांची नावं सरकारने बदलली पाहिजेत असे मत कायंदे यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले होते.

उत्तर प्रदेशमध्ये दोन शहरांचे नामांतरण करण्यात आल्यानंतर गुजरात सरकारनेही अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याचा विचार सुरु केला आहे. आम्ही लवकरच त्यासंबंधीचा निर्णय घेऊ असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये शहरांचे नामांतरण सुरु असतानाच त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 10:04 am

Web Title: loksatta poll shiv senas demand of renaming aurangabad osmanabad is right says 65 percent readers
Next Stories
1 जलयुक्तवर चारशे कोटी खर्चूनही शिवारे कोरडी
2 उशिरापर्यंत फटाके वाजवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे
3 भाजप मेळाव्यात अनिल गोटे यांना भाषणास मज्जाव
Just Now!
X