‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून श्रीगोंदा येथे बालिका वसतिगृह साकार

वृत्तपत्र समाजात वैचारिक परिवर्तन घडविण्याच्या प्रक्रियेला बळ देत असतंच, पण वाचकांमधील कृतिशीलतेला आणि सामाजिक जाणिवांना जोपासत समाजोपयोगी कार्याना चालनाही देऊ शकतं, याचा प्रत्यय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या अभिनव उपक्रमानं दरवर्षीच येत असतो. याच सामाजिक व्रताच्या माध्यमातून श्रीगोंद्यात २०० बालकांना हक्काचं घर मिळालं आहे.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात समाजासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ आपल्या वाचकांना करून देतं. त्यातून ज्या कार्याचं मोल वाचकांना अधिक वाटतं अशा संस्थांना वाचक थेट देणगी देतात. याच मार्गाने उभ्या राहिलेल्या आर्थिक सहयोगामुळे श्रीगोंद्यातील ‘महामानव बाबा आमटे संस्थे’तील फासेपारधी, भटक्या विमुक्त आणि दलित समूहातील २०० बालकांना हे हक्काचे घर मिळाले आहे.

या संस्थेच्या ‘जानकीदेवी बजाज वसतिगृहा’चे लोकार्पण झाले. संस्थेच्या मालकीच्या सात एकर जागेवरील नियोजित उपक्रमांमुळे लवकरच दरवर्षी ६०० महिला आणि युवकांना रोजगार, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाची संधी विनामूल्य उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे संघटक अनंत झेंडे आणि अनिल गावडे यांनी दिली. १२ हजार चौरस फुटांचे हे वसतिगृह आहे.

मूळच्या श्रीगोंदे  येथील आणि नंतर  मुंबईत स्थायिक झालेल्या डॉ. सारिका गिरीश आणि स्व. नीलकंठ कुलकर्णी यांनी आपला राहता वाडा संस्थेला देणगी म्हणून दिला होता. तेथे बालकांचे वसतिगृह २००८ मध्ये सुरू झाले. कुठलीही सरकारी मदत नसताना या संस्थेने दरवर्षी ७५ बालकांना संस्थेत नि:शुल्क प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. वाचनालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. याशिवाय गेल्या आठ वर्षांपासून व्याख्यानमाला, काष्टी येथे डोंबारी समाजातील बालकांसाठी आरंभ बालनिकेतन, महिलांकरिता बचतगट सुरू करण्यात आला. ससाणेनगर दलितवस्तीत बालभवन आणि रमणलाल मेहता वाचनालयही सुरू झाले. सर्वसामान्य देणगीदार आणि कार्यकर्ते यांच्या बळावर ही संस्था कार्यरत आहे. मात्र विद्यार्थ्यांची वाढती संख्या, युवक आणि महिलांच्या रोजगार, शिक्षण आणि पुनर्वसनासाठी सुमारे सात एकर जागेची आवश्यकता होती.

‘दैनिक लोकसत्ता’ने वाचकांना २४ सप्टेंबर २०१५ रोजी ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात या संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला होता. तो वाचून ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी तब्बल ३६ लाख रु पयांचा आर्थिक सहयोग संस्थेला दिला! त्यातून खरेदी केलेल्या जागेवर संस्थेचे ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्र’ साकार होत आहे. संस्थेत मुलींकरिता प्रामुख्याने दर्जेदार वसतिगृहाची आणि रोजगार प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता होती. बजाज फायनान्स कं पनीने दिलेल्या आर्थिक सहयोगातून येथे जानकीदेवी बजाज वसतिगृहाची वास्तू साकारली आहे.

१०० संस्थांचा मेळावा

दरवर्षीच्या गणेशोत्सवात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांची माहिती ‘लोकसत्ता’ वाचकांना देत असते. या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा ‘आनंदवन’चे कौस्तुभ आमटे यांनी, हा उपक्रम माणसे जोडणारा असल्याचे सांगून त्याचे कौतुक केले होते. आता या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर १०० संस्थांचा मेळावा ‘लोकसत्ता’ आयोजित करणार असल्याची माहिती संपादक गिरीश कुबेर यांनी दिली.