वैचारिक मांडणी, चपखल उदाहरणे सादर करीत मराठवाडा व खान्देशातील १२ स्पर्धकांनी ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक फेरीत यश मिळविले. दिवसभरात ५५ स्पर्धकांनी ‘सामाजिक चळवळीचा राजकीय परिणाम, अतिसंपर्काने काय साध्य?, जगण्याचे मनोरंजनीकरण, आपल्याला नायक का लागतात?, जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत?’ या विषयांवर जोरकसपणे मते मांडली. यातील यशस्वी १२ स्पर्धकांमध्ये औरंगाबाद जिल्हय़ाचे वर्चस्व दिसून आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळ, नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व जनकल्याण सहकारी बँकेच्या मदतीने सुरू असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेचा दुसरा दिवस तरुण वक्त्यांनी गाजवला. ‘आपल्याला नायक का लागतात?’ या विषयाकडे बहुतांश स्पर्धकांचा कल होता. प्राथमिक फेरीत दुसऱ्या दिवशीही वक्त्यांचा उत्साह कायम होता. प्राथमिक फेरीतील यशस्वी १२ स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे : प्रणव खाडे (आदर्श महाविद्यालय, हिंगोली), कौस्तुभ शेलगावकर (श्रीगुरुगोविंदसिंह इंजि. कॉलेज, नांदेड), भरत रिडलॉन (देवगिरी कला पदव्युत्तर महाविद्यालय, औरंगाबाद), प्रतिभा भोसले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, भूगोल विभाग), प्रसाद गावडे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद), माणिकलाल जैस्वाल (शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद), निकिता पाटील (देवगिरी कला कनिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद), आकांक्षा चिंचोलकर (देवगिरी कला वरिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद), शौनक कुलकर्णी (एमआयटी महाविद्यालय, औरंगाबाद), हृषीकेश सकनूर (शिवाजी महाविद्यालय, परभणी), धम्मपाल जाधव (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जनसंवाद व पत्रकारिता विभाग), दत्ता पिराणे (मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड).