करनो विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा ‘लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (लिफी) ऑनलाईन आयोजित केला जाणार आहे. परिणामी मोहोत्सवात प्रदर्शित केले जाणारे सर्व चित्रपट आता प्रेक्षकांना मोफत ऑनलाईन पाहाता येणार आहेत. चाहत्यांना ‘प्लेक्सिगो’ या अॅपवरुन हे सर्व चित्रपट घरबसल्या पाहाता येतील. इच्छूकांना www.onelink.to/Plexigo या लिंकवर जाऊन प्लेक्सिगो अॅप डाऊनलोड करता येईल.
लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्रातील एक नामांकित फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. यंदाचे त्यांचे हे पाचवे वर्ष आहे. या मोहोत्सवात नव्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं जातं. शिवाय जगभरात गाजलेल्या भारतीय आणि विदेशी चित्रपटांचं प्रदर्शन केलं जातं. यंदाच्या मोहोत्सवाची सुरुवात चित्रपट निर्माते श्री एन. एन. सिप्पी यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली जाणार आहे. शिवाय त्यांचे ‘वो कौन थी’, ‘गुमनाम, देवता’, ‘सरगम’, ‘फकिरा’, ‘चोर मचाए शोर’ असे काही गाजलेले चित्रपट देखील दाखवले जाणार आहेत. या चित्रपट मोहोत्सवासंबंधीत अधिक माहितीसाठी www.liffi.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच विवेक के : ९८२०३१०४८७, instagram.com/liffi_2020 igshid=r18uabenn51i या इन्स्टाग्राम आणि www.facebook.com/LIFFIIndia फेसबुक लिंकवरुन इच्छूकांना आयोजकांशी थेट संपर्क साधता येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 11:18 am