लोणावळा शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून गेल्या २४ तासात १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच ६.७७ इंच इतका पाऊस कोसळला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचे जोरदार आगमन केल्याचं पाहायला मिळत असून पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. यामुळे पर्यटन नगरी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी देखील वाढत आहे.

पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने गेले काही दिवस दांडी मारली होती. परंतु, पुन्हा पाऊस कोसळत असून गेल्या २४ तासात तब्बल १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नागरिक आणि स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच नदी, नाले, धरण, तलाव ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, यावर्षी एकूण १८४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा- पावसाची विक्रमाकडे वाटचाल

लोणावळ्यातील पावसाची आकडेवारी खालील प्रमाणे

चालू वर्षाचा कालच पाऊस- १७२ मिलिमीटर (6.77 इंच), यावर्षी कोसळलेला एकूण पाऊस- १,८४६ मिलिमीटर, मागील वर्षाचा कालचा पाऊस-२२ मिलिमीटर तर मागील वर्षी काल अखेर कोसळलेला एकूण पाऊस- १,३६५ लोणावळ्यात गेल्या वर्षी एकूण- 4,222 एवढा पाऊस पडला होता.