विमा कंपनीकडून प्रत्यक्ष पीक नुकसानीपोटी विमा रक्कम आली नसताना जिल्हा बँकेने स्वनिधीतून तब्बल ३ कोटी रुपये जास्तीचे परळी तालुक्यात वाटप केल्याचे उघड झाले. यात पीकविम्याचा हप्ता न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीकविमा वाटप करण्यात आले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांकडून पसे वसूल करण्याचे आदेश देऊन वर्ष लोटले, तरी हा पसा वसूल झाला नाही. दरम्यान, पीकविम्याच्या नावाखाली ३ कोटी रुपये लुटणाऱ्या संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. अजित देशमुख यांनी केली आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गरप्रकाराचे अनेक नमुने उघड होत आहेत. २००८मध्ये पीक विम्यापोटी बँकेला ९७ कोटी रुपये कंपनीकडून मिळाले असताना बँकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी १०० कोटी रुपये पीकविम्याचे वाटप करून बँकेच्या स्वनिधीतील ३ कोटी रुपये लुटल्याचे प्रकरण तपासणीत उघड झाले. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लातूर) यांनी याबाबत वसुली आदेश जारी करून बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, उपाध्यक्ष विलास बडगे, सहव्यवस्थापक शरद घायाळ व अरुण कुलकर्णी यांच्या काळातील या प्रकरणात १५ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून वसूल क रण्याचे आदेश बजावले होते. मात्र, त्यास वर्ष लोटले तरी या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. यात परळी तालुक्यातील शाखांचा समावेश असून, यातून ४९ लाख, वैद्यनाथ कारखाना पांगरी शाखेतून ९५ लाख, मार्केट यार्ड शाखेतून २७ लाख, धर्मापुरी शाखेतून ३३ लाख, सिरसाळा शाखेतून ६६ लाख, अंबा कारखाना शाखेतून १८ लाख, घाटनांदूर शाखेतून ३ लाख ५० हजार, उजनी शाखेतून ५० हजार रुपये वितरीत करण्यात आले.