News Flash

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एलपीजी टँकरने घेतला पेट

आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका एलपीजी टँकरचा दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. तलासरी तालुक्यातील अच्छाड नंदीगाव या ठिकाणी ही घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळतीही झाल्याने टँकरने पेट घेतला. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब मागील तीन तासांपासून प्रयत्न करत आहेत. या महामार्गावरची दोन्हीकडची वाहतूक सुरक्षेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आली आहे. मागील तीन तासांपासून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 5:49 pm

Web Title: lpg tanker fire on mumbai ahmedabad highway
Next Stories
1 ..तर बीडमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करू, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान
2 कुटुंबीयांना भेटण्यासाठी अरुण गवळीला हवी एक महिन्याची संचित रजा
3 मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही, मराठा समाजाचा निर्धार
Just Now!
X