पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची मुदतपूर्व बदली झाली असून त्यांच्या जागी , मुंबईतील शुल्क नियामक प्राधिकरण सचिवपदी कार्यरत असणाऱ्या एम. जी. गुरसळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
डॉ. कैलास शिंदे यांनी गेल्या १३ महिन्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यावर आलेल्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना विविध भागात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. तसेच करोना संक्रमणाच्या काळात जिल्ह्यात आजाराच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपायोजना आखण्यात आल्या.
पालघर जिल्हाधिकारीपदी कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत उन्नत करून या जागी नेमणूक करण्यात आली असल्याचे या संदर्भातील आदेशात म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2020 5:26 pm