10 August 2020

News Flash

मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्रात आमच्यासारखे सर्जन बसलेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

(PTI)

मध्य प्रदेशातील राजकीय अस्थितरतेवर भाष्य करताना महाराष्ट्रात आमच्यासारखे सर्जन बसलेत. मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. राज्यात जर असं कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला असून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिेंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार अस्थिर बनले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवेल का? या प्रश्नावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करुन पाहिला मात्र ते यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कारण इथं ऑपरेशन थिएटरमध्ये आमच्यासारखे सर्जन बसले आहेत. जर असं कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल.” असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2020 3:22 pm

Web Title: madhya pradesh virus wont infiltrate in maharashtra says sanjay raut aau 85
Next Stories
1 शरद पवारांचीही गणना बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? – गणेश नाईक
2 करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी पंकजा मुंडेंनी सांगितला उपाय, म्हणाल्या…
3 धक्कादायक! मुलाने संपवलं अख्खं कुटुंब, वृद्ध आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या
Just Now!
X