News Flash

राज्य सरकारी कर्मचारी व कुटुंबीयांना करोनावरील उपचारांचा खर्च मिळणार परत

राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात केलेल्या करोनावरील उपचारांच्या खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २ सप्टेंबर २०२० पासून हा आदेश लागू होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

टोपे यांनी ट्विटरवरुन सांगितलं की, “शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते. हा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-१९ या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 9:30 pm

Web Title: mah gov has decided to reimburse the medical expenses of covid 19 treatment of govt employees their family members aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …तर कृषी कायदे सुधारणांबाबत पत्र लिहिण्याची वेळच आली नसती; उपाध्येंचा चव्हाणांना टोला
2 महाराष्ट्रात दिवसभरात ४ हजार ३५८ रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९४ टक्के
3 सावित्रीबाई फुलेंची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून होणार साजरी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
Just Now!
X