31 March 2020

News Flash

रायगडात महाशिवरात्र उत्साहात

अलिबाग येथील उंच डोंगरावर असलेल्या श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी पोहोचले होते.

बम बम भोले आणि ओम नम: शिवायच्या गजरात रायगड जिल्ह्य़ात महाशिवरात्रीचा उत्सव मोठय़ा उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने जिल्ह्य़ातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.

अलिबाग येथील उंच डोंगरावर असलेल्या श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. शहरातील काशीविश्व्ोश्वर मंदिर, वेश्वीतील गोकुळेश्वर, गोरेगाव येथील त्र्यंबकेश्वर, पेणचे पाटणेश्वर, महलमिरा डोंगरावरील व्याघ्रेश्वर, महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरात भाविकांनी शिविलगाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. मंदिरात ओम नम:शिवाय, बम बम भोलेचा गजर सतत सुरू होता. मंदिरांबाहेर पूजेचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये पूजन, भजन, कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर काही संस्थांनी सामाजिक उप्रकमही राबवले होते. अलिबागजवळील थळ येथील आरसीएफ प्रकल्पातील सीआयएसएफ कॅम्पमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात जवानांनी रक्तदान केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 2:57 am

Web Title: maha shivaratri festival at raigad
टॅग Raigad
Next Stories
1 पर्यटनस्थळाचे अस्तित्व धोक्यात
2 ‘निर्णय घेताना सदसद्विवेकबुद्धी वापरा’
3 भटकणाऱ्या गरीब मुलामुलींना शिक्षणसंधी देणाऱ्या उपक्रमाचा गौरव
Just Now!
X