संपूर्ण देशात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. ‘महाशिवरात्री’चा उत्सव पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल रुक्मिणी’ मंदिरात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
14 injured in mahakal temple fire in mp
महाकाल मंदिरातील आगीत १४ जखमी
Pune, Dagdusheth Halwai Ganapati Temple, Holipurnima, Grapes, decoration, 2 thousand kg, Gabhara, sabha mandap,
पुणे: होळीपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

संपूर्ण मंदिर महाशिवरात्री निमित्त आकर्षक फुलांनी सजवले आहे. महादेवाला प्रिय असलेल्या तब्बल १०० किलो बेलाच्या पानांची आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदि ठिकाणी ही आरास केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जाता. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.