19 September 2020

News Flash

महाबळेश्वर : किल्ले प्रतापगड परिसरात आढळला १२ फुटी अजस्र अजगर

मादी जातीच्या या अजगराचे वजन चाळीस किलोहून अधिक

किल्ले प्रतापगड (ता महाबळेश्वर)  भागात गुरुवारी बारा फूट लांबीचा अजस्र अजगर जखमी अवस्थेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सापडला. त्यांनी प्राणिमित्रांच्या सहकार्याने या अजगरास पकडले. त्याच्यावर डॉ. जयसिंग सिसोदिया यांनी उपचार केले. या अजगरास  पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वनक्षेत्रपाल महेश झंजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने या परिसराला भेट दिली.

जंगलात जखमी अवस्थेत हा अजगर दिसला. त्याच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या. वनरक्षक रोहित लोहार, आशिष पाटील, लहू राऊत, दीपक सोरट, महादेव कट्टे, वनमजूर वागदरे, सह्याद्री प्रोटेक्‍टर्सचे संदेश भिसे, शुभम टेके यांनी हा अजगर पकडून सुरक्षितरित्या हिरडा विश्रामगृहात उपचारासाठी आणला होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग ससोदिया, डॉ. संदीप आरडे यांनी या अजगरावर उपचार केले. महाबळेश्वर तालुक्‍यात प्रथमच अजगर आढळला आहे. मादी जातीच्या या अजगराचे वजन चाळीस किलोहून अधिक असून त्याचे वय अंदाजे सात ते आठ वर्षे असावे, असे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 8:31 pm

Web Title: mahabaleshwar a huge 12 feet pythons was found in the pratapgad area of the fort msr 87
Next Stories
1 गडचिरोली : तेंदूपत्ता कंत्राटदाराच्या वाहनातून एक कोटीची रोकड जप्त
2 महाराष्ट्रात ३४९३ नवे करोनाबाधित, १२७ मृत्यू, संख्येने ओलांडला १ लाखाचा टप्पा
3 उस्मानाबाद जिल्ह्यात करोनामुक्तीचे प्रमाण 65 टक्क्यांवर
Just Now!
X