News Flash

महाबळेश्वरचे सदाहरीत जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरु होणार

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे ,अशी माहिती साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

महाबळेश्वरचे सदाहरीत जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरु होणार ( file photo)

जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु, वन विभागाच्या नियमांमुळे जंगलात जावून जंगलाची सफर करणे शक्य होत नाही. परंतु आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने महाबळेश्वर येथे सुरू करण्यात येणार आहे. जंगलातील राईडची दुरुस्ती करून गाईडसह पर्यटकांना ही जंगल सफर घडवण्यात येणार आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

महाबळेश्वर वन व्यवस्थापन महासमिती व वन विभागातील विविध अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाबळेश्वर येथील बैठकीत उपस्थित असलेल्या वन समितीच्या सदस्यांनी अनेक मागण्या केल्या. त्यापैकी काही मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सदाहरीत घनदाट जंगल आहे. हे जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु, वन विभागाच्या नियमांमुळे जंगलात जावून जंगलाची सफर करणे शक्य होत नाही. परंतु, आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.

जंगलातील राईडची दुरुस्ती करून गाईडसह पर्यटकांना ही जंगल सफर घडवण्यात येणार आहे. लॉडविक पॉईंट ते प्रतापगड रोपवे हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाबळेश्वरच्या पाहणीत ऑर्थरसीट येथे काचेची प्रेक्षा गॅलरी तयार करता येईल का किंवा परदेशातील धर्तीवर काही नवीन प्रोजेक्ट तयार करता येतो का, हे पाहिले जाणार आहे. हेलन पॉईंट, बॉबिंगटन पॉईंट सारखे दुर्लक्षित पॉईंटचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. याठिकाणी रानगव्यांचे प्रमाण वाढले आहे. रानगवे हे मानवी वस्तीत येऊ नयेत, यासाठी जंगलातच त्यांच्यासाठी गवताचे कुरण विकसित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वनप्राण्यांसाठी वन पाणवठे तयार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा- पर्यटन महामंडळाची पुणे विभागातील निवासस्थाने सुरू

जंगलातील पाऊलवाटा व अस्तित्वात असलेले रस्ते यांचोही दुरुस्ती करण्यात येणार आहे. वन विभागाच्या ताब्यातील शासकीय विश्रामगृह चालवण्यासाठी व न समितीकडे हस्तांतर करण्यात येणार आहे . आवश्यक त्या ठिकाणी जंगलात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. महाबळेश्वरसाठी जो १०० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे, त्यापैकी काही रक्कम ही वन विभागाकडे येणार आहे. त्या रकमेतून पर्यटकांसाठी काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, असेही मोहिते यांनी सांगितले. संयुक्त वनव्यवस्थापन महासमितीच्या वतीने अनिल भिलारे यांनी स्वागत केले. विनय भिलारे यांनी आभार मानले. बैठकीला वनक्षेत्रपाल दिलीप झगडे, वन व्यवस्थापन समितीचे शांताराम धनावडे, विलास मोरे, पंढरीनाथ लांगी, कादर सय्यद नाना वाडेकर, रमेश चोरमले, विष्णू भिलारे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 10:33 pm

Web Title: mahabaleshwar evergreen jungle safari will start for tourists srk 94
Next Stories
1 Maharashtra Corona Cases : राज्यात आज ११ हजार ७६६ नवे करोनाबाधित; रिकव्हरी रेट ९५.४ टक्क्यांवर!
2 HSC Exams : यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास! अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय!
3 पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेवून आत्महत्या; नायगाव तालुक्यातील घटना
Just Now!
X