विश्वास पवार

करोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीत अडकलेल्या लोकांना पर्यटनास परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा एकदा पर्यटनस्थळांकडे धाव घेतली आहे. एकटय़ा महाबळेश्वरमध्ये गेल्या पंधरा दिवसांत सव्वा लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट देत पर्यटनाचा आनंद लुटला आहे.

The number of leopards in India has now reached 13 thousand 874
बाबो, भारतात बिबट्यांची संख्या आता १३ हजार ८७४….
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…

मार्च महिन्यात करोना अवतरल्यानंतर लगोलग राज्यातील सर्व पर्यटनस्थळे ही पर्यटनासाठी बंद करण्यात आली होती. पर्यटनावरील ही बंदी पुढे सलग आठ महिने होती. या प्रदीर्घ कालावधीनंतर पर्यटनास पुन्हा परवानगी मिळताच महाबळेश्वर, पाचगणी पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. याशिवाय पर्यटन हंगाम सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांमध्येही मोठा उत्साह दिसू लागला आहे.

१० नोव्हेंबरच्या दरम्यान शासनाने पर्यटनस्थळे सर्वासाठी खुली केली. १२ नोव्हेंबरपासून महाबळेश्वर पालिकेने पर्यटकांसाठी सर्व पॉइंट व वेण्णा सरोवरमधील नौकानयन खुले केले. १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महाबळेश्वर येथे सव्वा लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद पालिकेकडे झाली आहे. याशिवाय नोंद न करता आलेल्या पर्यटकांची संख्या विचारात घेता हा आकडा अजून मोठा असण्याची शक्यता आहे. साधारणत: ३० नोव्हेंबपर्यंत पर्यटकांच्या या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाबळेश्वरमधील पर्यटन सुरू झाल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांमध्येही उत्साह संचारला आहे. महाबळेश्वरमध्ये हॉटेल-लॉज चालक, पर्यटक वाहन चालक, घोडेस्वारी-नौकानयन करणारे, छोटे-मोठे विक्रेते अशा प्रकारचे शेकडो व्यावसायिक आहेत. गेले आठ महिने पर्यटनाअभावी या सर्वच लोकांच्या रोजगारावर गदा आली होती. मोठय़ा व्यावसायिकांना त्यांच्याकडील मालमत्ता, नोकर सांभाळणे अवघड बनले होते. तर छोटय़ा विक्रेत्यांचे पोट हे रोजच्या विक्रीवर अवलंबून असल्याने त्यांनाही मोठय़ा हलाखीचा सामना करावा लागत होता. आठ महिन्यांनंतर का होईना महाबळेश्वरमधील हे पर्यटन पुन्हा सुरू झाल्याने या व्यावसायिकांमध्ये पुन्हा उत्साह पसरला आहे.

यंदा दिवाळीपासून महाबळेश्वरमध्ये पर्यटक मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत. या पर्यटकांनी या स्थळावरचे सर्व पॉइंट व वेण्णा सरोवर पुन्हा एकदा फुलून गेले आहे. गेले आठ महिने शांत असलेले हे गिरिस्थळ या पर्यटकांमुळे पुन्हा एकदा गजबजून गेले आहे.

नियमांचे पालन

या सर्व पर्यटकांची करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती तपासणी करतच त्यांना प्रवेश दिला जात आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मुखपट्टी लावणे बंधनकारक आहे. हॉटेल, पॉइंट, नौकानयन, वाहनात बसताना त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये तापमानाची नोंद, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण तपासले जाते. या प्रत्येकस्थळी खबरदारीचा उपाय म्हणून जंतुनाशकाचा (सॅनिटायझर) वापर केला जातो. हॉटेल, दुकाने, नौकानयनवेळी सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन केले जाते.