08 July 2020

News Flash

महाबळेश्वरचा जीवघेणा धबधबा, दगड डोक्यात कोसळल्याने पर्यटक तरुणीचा मृत्यू

सोनाली गायकवाड ही तरुणी मंगळवारी महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आली होती. प्रतापगड मार्गावर...

(सांकेतिक छायाचित्र)

महाबळेश्वरमध्ये धबधब्यातील पाण्याबरोबर वाहून आलेला दगड डोक्यात पडल्याने पर्यटक तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनाली गायकवाड (रा. भोर) असे मृत तरुणीचे नाव असून जखमी अवस्थेत तिला शिरवळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली गायकवाड ही तरुणी मंगळवारी महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आली होती. प्रतापगड मार्गावर असलेल्या मेटतळे येथील धबधब्यावर ती पर्यटनाचा आनंद लुटत होती. त्याचवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेला एक दगड सोनालीच्या डोक्यात कोसळला. या दुर्घटनेत ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला जबर मार लागला. सोनालीला तात्काळ उपचारासाठी शिरवळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे. महाबळेश्वरसारख्या प्रसीद्ध पर्यटनस्थळी धबधब्यातून दगड कोसळून एका तरुणीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 1:22 pm

Web Title: mahabaleshwar tourist girl died as stone fallen on the head from waterfall sas 89
Next Stories
1 “शरद पवारांकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या”
2 निवडणुकीत भाजपा उमेदवारालाच चारली धुळ, पण आता दिला बिनशर्त पाठिंबा
3 धनंजय मुंडे नाही तर ‘या’ भावाबरोबर पंकजा यांनी साजरी केली भाऊबीज
Just Now!
X