राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पुढील दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकप्रिय घोषणा होतील अशी शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. याआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी २७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला होता. आचारसंहिता आणि निवडणूक वर्ष यामुळे तो अंतरिम अर्थसंकल्प होता. मंगळवारी सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला.

Live Blog

15:40 (IST)18 Jun 2019
अर्थसंकल्प संपताच सभागृहात भारतमाता की जय अशी घोषणाबाजी

अर्थसंकल्प संपताच सभागृहात भारतमाता की जय अशी घोषणाबाजी

15:35 (IST)18 Jun 2019
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातंर्गत आतापर्यत रु. २ हजार २०० कोटी किमतीचे ४० प्रकल्प
15:32 (IST)18 Jun 2019
शिवडी न्हावा शेवा मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर
15:31 (IST)18 Jun 2019
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर
15:28 (IST)18 Jun 2019
अर्थसंकल्प फुटला आहे या विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

ट्विटरवर आलेले सर्व ट्विट हे भाषणाआधी आलेले नाहीत. त्यात १५ मिनिटांचं अंतर आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावेळी पीएमच्या ट्विटमध्ये फक्त २ ते ३ मिनिटांचं अंतर असतं. त्याची लाईव्ह बातमीही सुरु असते. डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतं. विरोधी पक्षांनी ही माध्यमं समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात आम्ही सकारात्मक वापर करत आहेत यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये. विरोधकांनी पुन्हा सभागृहात यावं.

15:25 (IST)18 Jun 2019

पुन्हा पुन्हा सेवेचा द्या आम्हाला आशिर्वाद, सुधीर मुनगंटीवार यांचं जनतेला साकडं

15:23 (IST)18 Jun 2019
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. ६ हजार ६९५ कोटी इतका खर्च अपेक्षित
15:23 (IST)18 Jun 2019
नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु
15:23 (IST)18 Jun 2019
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पुर्ण
15:21 (IST)18 Jun 2019

गेल्या चार वर्षात वाघांच्या संख्येत वाढ - सुधीर मुनगंटीवार

15:20 (IST)18 Jun 2019
रस्ते विकास योजनेतंर्गत सन २००१-२०२१ मध्ये एकूण ३ लाख ३६ हजार ९९४ किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट
15:18 (IST)18 Jun 2019
महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात येणार

महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात येणार, त्यासाठी निधीची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

15:17 (IST)18 Jun 2019
सहकारी संस्थाच्या नाविण्यपुर्ण प्रकल्पांशी संबंधित अटल अर्थसहाय्य योजनेकरीता रु. ५०० कोटी निधी उपलब्ध
15:17 (IST)18 Jun 2019
भावांतर योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात आणखी रु. ३९० कोटी निधी उपलब्ध करणार
15:17 (IST)18 Jun 2019
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी रु. २४ हजार १०२ कोटी मंजूर
15:16 (IST)18 Jun 2019

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत उभारले जाणार - सुधीर मुनगंटीवार

15:16 (IST)18 Jun 2019

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटींच्या खर्चास मान्यता - सुधीर मुनगंटीवार

15:15 (IST)18 Jun 2019
नीलक्रांती अभियानातंर्गत ससून गोदी बंदराचे आधुनिकीकरण
15:13 (IST)18 Jun 2019

गोंधळानंतर विरोधकांचा सभात्याग

15:13 (IST)18 Jun 2019

दहावी आणि बारावीत नापास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसंच आपल्या पायावर उभे राहावेत यासाठी रोजगार कौशल्य प्रशिक्षण देणयाचा प्रस्ताव - सुधीर मुनगंटीवार

15:09 (IST)18 Jun 2019

शिर्डीतील भाविकांसाठी सुरक्षेसाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार - सुधीर मुनगंटीवार

15:08 (IST)18 Jun 2019
राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
15:07 (IST)18 Jun 2019
15:07 (IST)18 Jun 2019

महिला बचट गटांची जनजागृती करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा विचार - सुधीर मुनगंटीवार

15:06 (IST)18 Jun 2019

अल्पसंख्यांक समाजातील महिला आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी १०० कोटींची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

15:04 (IST)18 Jun 2019
२ हजार २२० कोटी रु. किमतीचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्ततन प्रकल्प राबविणार
15:04 (IST)18 Jun 2019
सामुहिक गटशेतीसाठी चालू आर्थिक वर्षात रु. १०० कोटी इतका नियतव्यय राखीव
15:04 (IST)18 Jun 2019
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता
15:03 (IST)18 Jun 2019
कृषी विद्यापीठे व नवीन कृषी महाविद्यालये यासाठी रु.२०० कोटी नियतव्यय राखीव
15:02 (IST)18 Jun 2019

सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांचा जोरदार गोंधळ.  विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांना खडसावलं असून आक्षेप होता तर आधीच घ्यायला हवा होता असं बजावलं.

15:00 (IST)18 Jun 2019
२ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी
15:00 (IST)18 Jun 2019
सुक्ष्म सिंचनासाठी रु. ३५० कोटी इतका नियतव्यय राखीव
14:59 (IST)18 Jun 2019
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राज्य अभिसरण आराखडयाची अंमलबजावणी
14:58 (IST)18 Jun 2019
मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत २५ हजार शेततळी पुर्ण करण्याचे उद्दीष्ट
14:57 (IST)18 Jun 2019
मृद व जलसंधारण विभागाकरीता रु. ३ हजार १८२ कोटी २८ लक्ष ७४ हजार तरतूद
14:56 (IST)18 Jun 2019
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ६ लक्ष २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पुर्ण
14:55 (IST)18 Jun 2019

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी १०० कोटी निधी राखून ठेवण्यात येत आहे

14:52 (IST)18 Jun 2019

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी १५० कोटींची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

14:50 (IST)18 Jun 2019

सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटींची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

14:48 (IST)18 Jun 2019
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ६ लक्ष २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पुर्ण