04 March 2021

News Flash

महाडच्या तेरा शाळांचा शंभर टक्के निकाल

शालान्त परीक्षेत महाड तालुक्यातील तेरा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शालान्त परीक्षेत महाड तालुक्यातील तेरा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. समर्थ रामदास विद्यालय नवयुग विद्यापीठ, सेंटझेवियर्स स्कूल या शाळांनी आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, तळोशी येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल सर्वात कमी म्हणजे ३८.२३ टक्के इतका लागला आहे. संस्कारधाम विद्यालय मराठी (खरवली) गुरुकुल अ‍ॅकॅडमी, एसव्ही एम खरवली, दर्दमंद कालसेकर हायस्कूल – महाड, ए. आर. उंडरे हायस्कूल – अप्पर तुडील, आयडियल ट्रस्टचे शेख हुसेन काझी विद्यालय – महाड, तात्यासाहेब नातू विद्यालय – कुर्ले, न्यू इंग्लिश स्कूल – निगडे, जयजवान जयकिसान विद्यामंदिर – वाघेरी, ए. एस. जाधवराव इंग्लिश मीडियम स्कूल – लाडवली, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय – महाड या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 12:03 am

Web Title: mahad 13 school get 100 percent results in ssc 2016
Next Stories
1 कराडला कन्यागत पर्वकाळ सोहळा
2 आता दर महिन्याच्या २१ तारखेला राज्यात योग दिन
3 महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, पर्यटकांची त्रेधा
Just Now!
X