महापुरामुळे महाड शहरात चिखल आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील कचरा उचलण्यासाठी मोहीम राबिविण्यात येत आहे. शनिवारपर्यंत तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलण्यात आला आहे. महाडमधून काढण्यात येत असलेला कचरा बघून नागरिकही अचंबित होत आहेत.

महापूरानंतर महाड शहरात दीड ते दोन फूट चिखलाचा थर जमा झाला होता. घरामधील अन्नधान्य भिजल्यानं कुजण्यास सुरवात झाली होती. बाजारपेठेतील मालही भिजून खराब झाला होता. हा सर्व कचरा शहरातील रस्त्यांवर पडला होता. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. शहराची स्वच्छता करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यामुळे मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पनवेल अंबरनाथ आणि पुणे महानगर पालिकांची यांची स्वच्छता पथके यांत्रिक सामुग्रीसह महाड मध्ये दाखल झाली होती. या शिवाय रायगड जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांचे स्वच्छता कर्मचारी महाड मध्ये बोलविण्यात आले होते.

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार
शहराची स्वच्छता करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यामुळे मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पनवेल अंबरनाथ आणि पुणे महानगर पालिकांची यांची स्वच्छता पथके यांत्रिक सामुग्रीसह महाड मध्ये दाखल झाली होती.

१० जेसिबी, १ पोकलेन, १० मोठे ट्रक, १० डंपर, ४ ट्रॅक्टर, १ लोडर आणि ६ घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या शिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे २ हजार सदस्य, नरेंद्र महाराज प्रतिष्ठान ३ हजार सदस्य आणि आदर पुनावाला ट्रस्टचे सदस्य या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते. सात दिवसात तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलण्यात आला. अजून सुमारे ३ हजार मेट्रीक टन कचरा शिल्लक आहे. हा कचरा उचलण्याचे काम सुरु आहे. पुरग्रस्त भागात धुर आणि औषध फवारणीचे काम सुरु करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासना मार्फत देण्यात आली आहे.