महाड येथे गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

महाड येथील करंजखोल येथे राहणाऱ्या स्वाती बळीराम धुमाळ (वय, ३४) या महिलेने एका अल्पवयीन मुलीला गाठले. मुलीची आर्थिक स्थिती हलाखीची होती. याचा फायदा घेत स्वातीने तिला वेश्याव्यवसायात ढकलले. तिने त्या मुलीकडे काही ग्राहक पाठवले होते. यानंतर स्वातीने त्या मुलीला प्रवीण यशवंत निकम ( वय ५५, रा. करंजखोल ) या दलालाच्या स्वाधीन केले. प्रवीण निकमने त्या मुलीवर बलात्कार केला आणि यानंतर ग्राहकांकडून पैसे घेऊन त्या मुलीला शरिरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.

pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
woman gave birth in an ambulance
नंदुरबार : एका आरोग्य केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पाठवणी, बंद रुग्णवाहिकेतच प्रसुती, अन…
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

हा सर्व प्रकार या मुलीच्या आईला समजल्यानंतर, तिने सोमवारी मुलीसह महाड शहर पोलीस ठाणे गाठले, आणि पिडीत मुलीला पोलिसांकडे तक्रार द्यायला लावली. तक्रारीत या मुलीने स्वाती धुमाळ, प्रवीण निकम यांच्यासह अजय उर्फ अजित रामचंद्र पवार (वय २५ रा. आदर्श नगर, महाड )श्रवण भैरवसिंह राजपूत उर्फ चट्ठाना (वय २२ रा. जुना पोस्ट, महाड ),उमेश मोतीराम सावरे (वय २५ रा. नवेनगर, महाड),रणजित रमेश नातेकर (वय ३७, प्रभात कॉलनी, महाड ) आणि निलेश शिंदे ( महाड ), यांचा उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजामाता उद्यानाजवळील इमारत, गवळ आळी, प्रभात कॉलनी, काकरतळे, मांडले गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या आरोपींपैकी स्वाती बळीराम धुमाळ,प्रवीण यशवंत निकम, अजय उर्फ अजित रामचंद्र पवार, श्रवण भैरवसिंह राजपूत उर्फ चट्ठाना, उमेश मोतीराम सावरे, रणजित रमेश नातेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. निलेश शिंदे हा अजूनही फरार आहे.