News Flash

आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही : महादेव जानकर

आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाशी जोडले गेलो आहोत.

भगवान गडावरील मेळाव्याला आज भाजपा आणि भाजपाच्या घटकपक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भगवान गडावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, भाजपाचे नेते प्रकाश महेता, हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, महादेव जानकर, पाशा पटेल उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महादेव जानकर यांनी बोलताना आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.

आपला नेता मोठा व्हायचा असेल तर आपण आपल्या नेत्याचं स्वागत केलं पाहिजे, असं जानकर यावेळी म्हणाले. जय-परायज हा होतच असतो. परंतु सर्वांनी आपल्या नेत्याच्या पाठिशी कायम उभं राहायचं असतं. आम्ही भाजपाचे मित्र पक्ष घटकपक्ष आहोत. आम्हाला कोणी कितीही त्रास दिला तरी आम्ही कुठेही जाणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

आमच्या मनात खोट नाही. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाशी जोडले गेलो आहोत. आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही. आम्हाला दुसऱ्यांच्या दारी जाऊन मोठं व्हायचं नाही. मी केवळ माझ्या पक्षाचाच आहे. माझा पक्ष यापुढेही भाजपासोबतच राहिल. यापुढे आम्हाला वेगळी वागणूक देऊ नका. पण तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्ही त्रास देता असं जानकर यावेळी चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भगवान गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी त्यांच्याकडू पंकजा मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:09 pm

Web Title: mahadev jankar criticize shiv sena over various issues bjp gopinath munde bhagwangad jud 87
Next Stories
1 “जो प्रश्न आपल्याला समजतही नाही तो प्रश्न सोडवून शरद पवार मोकळे झालेले असतात”
2 “गोपीनाथ मुंडे यांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही”, एकनाथ खडसेंचा भाजपाला घरचा आहेर
3 राज्याला धक्का देणाऱ्या ‘पुलोद’ प्रयोगानं महाराष्ट्राला दिला सर्वात तरुण मुख्यमंत्री
Just Now!
X