भगवान गडावरील मेळाव्याला आज भाजपा आणि भाजपाच्या घटकपक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भगवान गडावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, भाजपाचे नेते प्रकाश महेता, हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, महादेव जानकर, पाशा पटेल उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महादेव जानकर यांनी बोलताना आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपला नेता मोठा व्हायचा असेल तर आपण आपल्या नेत्याचं स्वागत केलं पाहिजे, असं जानकर यावेळी म्हणाले. जय-परायज हा होतच असतो. परंतु सर्वांनी आपल्या नेत्याच्या पाठिशी कायम उभं राहायचं असतं. आम्ही भाजपाचे मित्र पक्ष घटकपक्ष आहोत. आम्हाला कोणी कितीही त्रास दिला तरी आम्ही कुठेही जाणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

आमच्या मनात खोट नाही. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाशी जोडले गेलो आहोत. आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही. आम्हाला दुसऱ्यांच्या दारी जाऊन मोठं व्हायचं नाही. मी केवळ माझ्या पक्षाचाच आहे. माझा पक्ष यापुढेही भाजपासोबतच राहिल. यापुढे आम्हाला वेगळी वागणूक देऊ नका. पण तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्ही त्रास देता असं जानकर यावेळी चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भगवान गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी त्यांच्याकडू पंकजा मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadev jankar criticize shiv sena over various issues bjp gopinath munde bhagwangad jud
First published on: 12-12-2019 at 14:09 IST