छत्रपतींच्या घरांण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला खूप काही दिले परंतु राष्ट्रवादीने छत्रपतींना काय दिले याचा हिशोब राष्ट्रवादी देणार का असे विचारून छत्रपतींचे घराने देणारे घराणे आहे ते घेणारे घराणे नाही त्यांनी तुमच्या पक्षाला खूप काही दिले आहे तुम्ही त्यांना काही दिले त्याचा आधी हिशोब द्या. तुम्ही त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे उत्तर साताऱ्यातील व महाराष्ट्रातील जनताच तुम्हाला देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे महाजनादेश यात्रेत सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सातारा येथे आली ,महाजनादेश यात्रेचे सातारकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.यानंतर जाहीर सभा झाली यावेळी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले ,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सिंचन मंत्री गिरीश महाजन ,शेखर चरेगावकर, रणजीत सिंह नाईक निंबाळकर, मदन भोसले, विक्रम पावस्कर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कोणतीही अट ठेवून ते वैयक्तिक कामे घेऊन भाजपा मध्ये आलेले नाहीत तर त्यांनी फक्त जनतेची कामे सुचविली आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले या पाच वर्षात महायुती सरकारने राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प, गावागावातील पाणीपुरवठा योजना, आरोग्य योजना रस्त्यांची कामे पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची मदत करून ताकद दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना प्रकल्प सुरू झाले आघाडी सरकारच्या काळात हे प्रकल्प रखडले परंतु यापुढे दुष्काळाचा कोणताही ठपका या परिसरावर बसणार नाही.

सातारा शहराची हद्दवाढ ,वैद्यकीय महाविद्यालय, शहरातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते या आदेशाने सर्व कामे मजूर तर होतीलच जर हाद्दवाढीची फाईल तयार असेल तर उद्याच मंजूर करण्यात येईल तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी ५०कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. लोकशाहीमध्ये प्रजा हीच राजा आहे आम्ही आमच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी आलो आहे आत्ताच विधानसभेचा निकाल लागला आहे असे सर्वत्र चर्चा असतानाही सरकारने पाच वर्षात केलेली कामे जनतेला सांगून, लोकांचे म्हणणे ऐकून आपले संवाद साधण्यासाठी मी राज्यात फिरतो आहे .सर्वांनी मला जनादेश दयावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले