घरोघरी लक्ष्मीचा वास असू दे, या साठी महालक्ष्मीची यथासांग पूजा करून नवेद्य अर्पण करण्यात आला. महालक्ष्मीच्या पूजेची घरोघरी जोरदार तयारी सुरू होती. नव्याने लक्ष्मीपूजा करणाऱ्यांच्या घरात मुखवटे, हात, कोथळय़ा, स्टँड याची खरेदी सुरू होती. शहरात ठिकठिकाणी दुकाने सजली होती. लक्ष्मीसमोरील आरास सजविण्यास खेळण्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होती. प्लास्टिक फुलांसोबत नसíगक फुलांचे हार घेतले जातात. या वर्षी याचा भाव १०० ते १ हजार रुपयांपर्यंत होता. गुलाबाच्या फुलाची किंमत १५ रुपयांपर्यंत होती. भाज्यांचे भावही चांगलेच वधारले होते. लक्ष्मीच्या नवेद्यासाठी १६ भाज्या करण्याची प्रथा असल्यामुळे अनेक भाज्या एकत्र करून विकल्या जात होत्या. केळी, सफरचंद यांचे भावही वाढले होते.
महालक्ष्मीचा नवेद्य केळीच्या पानावर दाखवण्याची प्रथा असल्यामुळे १० रुपयांना केळीचे पान विकले जात होते. विडय़ाच्या पानाच्या किंमतीही दिवसभरात वाढल्या. सणासाठी लातूरच्या बाहेर राहणारी मंडळी जिल्हय़ात येत असतात. त्यामुळे एस. टी. मंडळाने जादा बसेस सोडल्या, तर खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासभाडे दीडपटीपेक्षा अधिक वाढविले.