27 February 2021

News Flash

‘ही’ सहा समीकरणं जुळली नाहीत, तर राज्यात राष्ट्रपती राजवट!

राज्यात सरकार स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे

दिवसेंदिवस राज्यात सत्तास्थापनेचा पेच वाढत चालला आहे. शिवसेना आणि भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रवादीला आमंत्रण दिलं आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं सध्या पवारांकडे लक्ष लागले आहे. भाजपा, शिवसेना यांच्यानंतर राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यास राज्यात सरकार स्थापन होणार की, राष्ट्रपती राजवट असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. जाणून घेऊयात राजकीय तज्ज्ञांनी मांडलेली विविध समीकरणं …

 • काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळू शकतं –
  मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा फेटाळल्यास राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला आमंत्रण देऊ शकतात. पण काँग्रेसची आवस्थाही राष्ट्रवादीसारखी होऊ शकते.
 • भाजपा पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करू शकत –
  सत्ता स्थापनेसाठी लागणारे बहुमत नसल्यामुळे भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. पण, पुन्हा एकदा भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. अन्य कोणत्याही पक्षाच्या मदतीनं भाजपा पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतो. २०१४ मध्ये भाजपाने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.
 • शिवसेनेची भूमिका –
  मुख्यमंत्रीपदामुळे भाजपाबरोबर फारकत घेतल्यानंतर शिवसेनेलाही सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. आता राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. त्यामुळे उद्वव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
 • राष्ट्रपती राजवट आणि मध्यावधीचा सल्ला –
  कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही पुन्हा एकदा राज्यपाल प्रत्येक पक्षाशी चर्चा करून सत्ता स्थापनेची समीकरणं पडताळून पाहू शकतात.
 • विधानसभेच्या निकालावरुन राज्यपाल सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या पक्षातील नेत्याला मुख्यमंत्री बनवू शकतात. त्यानुसार भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात शपथग्रहण करेल. त्यानंतर भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. २०१४ प्रामाणे भाजपा इतर पक्षातील आमदारांना फोडून आवाजी मतदानाद्वारे विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकते.

कोणत्याच राजकीय पक्षाने सरकार स्थापन करण्यास समर्थता न दर्शविल्यास राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती तसा आदेश लागू करतात. या काळात राज्यपाल व त्यांनी नेमलेल्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार कामकाज पाहिले जाते. ठराविक कालावधीनंतर राज्यपाल हे राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याची शिफारस करू शकतात. विधानसभेचं कामकाज संसद करते. त्यासाठी दोन महिन्यांच्या आत संसदेची मंजुरी आवश्यक आहे. राज्यात सहा महिने किंवा कमाल एका वर्षासाठी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:03 pm

Web Title: maharashtra 2019 vidhan sabha election government formation shiv sena bjp and ncp congress nck 90
Next Stories
1 ‘अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटले म्हणून राऊत मुद्दाम आडवे’ : निलेश राणे
2 महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंबंधी मल्लिकार्जून खर्गे यांचे महत्वपूर्ण विधान
3 काँग्रेस-राष्ट्रवादीची रद्द झालेली भेट पुन्हा ठरली
Just Now!
X