डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० ऑगस्ट रोजी दोन वष्रे पूर्ण होत आहेत. अद्यापही शासनाला त्यांच्या मारेकऱ्यांना व सूत्रधारांना पकडता आलेले नाही यासाठी  २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंनिसच्या राज्यभरातील सर्व शाखा धरणे, आंदोलने, मानवी साखळी या प्रकारे आंदोलने करणार आहेत. तसेच राज्यातून राष्ट्रपतींना हा तपास त्वरित होण्यासाठी एक लाख पोस्टकरड पाठवणार आहेत. अंनिस रायगड शाखेतर्फे अलिबाग येथेदेखील आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे क्षाला, त्यानंतर कॉ. गोिवदराव पानसरे व त्यांची पत्नी यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ हल्ला क्षाला. त्यात कॉ. पानसरे हे बळी पडले. परिवर्तनाचा विचार, प्रसार करणारे दोन दिग्गज यांचा खून होणे हे शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्राच्या हे पुरोगामी विचारास काळे फासणारे आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० ऑगस्ट २०१५ रोजी दोन वष्रे पूर्ण होत आहेत. अद्यापही शासनाला त्यांच्या मारेकऱ्यांना व सूत्रधारांना पकडता आलेले नाही. यासाठी महा. अंनिसच्या राज्यभरातील सर्व शाखा धरणे, आंदोलने, मानवी साखळी, या प्रकारे आंदोलने करणार आहेत. तसेच राज्यातून राष्ट्रपतींना हा तपास त्वरित होण्यासाठी एक लाख पोस्टकरड पाठवणार आहेत, असे अंनिसचे सरचिटणीस नितीनकुमार राऊत यांनी कळविले आहे.
या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने रायगड शाखा ‘िहसा के खिलाफ मानवता की ओर’ या अभियांनातर्गत अलिबाग येथे गुरुवार २० ऑगस्ट रोजी मानवी साखळी, रॅली व धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. सकाळी १०.३० ते १२ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाजवळ मानवी साखळीचे आयोजन करण्यात येईल. दु. १२ ते १ या वेळेत रॅली मार्ग महावीर चौक-बालाजी नाका-मारुती नाका-अप्सरा हॉटेल-स्टेट बँक ऑफ इंडिया ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे धरण्यात येईल.
मानवी साखळी व रॅलीदरम्यान सहभागी कार्यकत्रे चळवळीची गाणी म्हणतील व घोषणा देतील, या नियोजित अभियानात जिल्हय़ातील महाराष्ट्र अंनिस कार्यकत्रे व समविचारी संस्था व्यक्ती, विदय़ार्थी सहभागी होतील. तसेच महाराष्ट्र अंनिसही विवेकवादी संघटना असून नियोजित सर्व कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहेत, असे महाराष्ट्र अंनिसचे नितीनकुमार राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.