16 February 2019

News Flash

ISIS : ‘आयसिस’च्या संपर्कात असलेल्या तरुणाला परभणीतून अटक

नसीरबिन याफी चाऊस असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव

परभणीतील एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अकाऊंट्सवरुन सीरियामधील फारुख नावाच्या तरुणाच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया(ISIS,आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) परभणीतून एका तरुणाला अटक केली आहे. नसीरबिन याफी चाऊस असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो २१ वर्षांचा आहे. नरीसबिन ‘आयसिस’च्या संपर्कातून राज्यात घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

वाचा: आयसिसशी संबंधित संशयित दहशतवाद्यास वर्धमान जिल्ह्य़ात अटक

परभणीतील एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अकाऊंट्सवरुन सीरियामधील फारुख नावाच्या तरुणाच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सीरियातील तरुणाच्या संपर्कातून नरीसबिन राज्यात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होता. याशिवाय, तो सीरियात जाऊन आयसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न देखील करत होता, असेही पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी आज कारवाई करत नरीसबिन याला अटक केली आहे. त्याच्या अटकेतून राज्यातील त्याच्या कारवायांबाबतची महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वाचा: भारतात हल्ले घडवून अधिकाऱयांना ठार मारा, ‘अल-कायदा’चे मुस्लिमांना फूस लावण्याचे प्रयत्न

दरम्यान, जानेवारी महिन्यात देखील ‘एटीएस’ने ‘एनआयअ’ने संयुक्त कारवाई करत मुंबईतील एका तरुणाला दहशतवादी पथकाशी संपर्कात असल्याच्या संशयातून अटक केली होती. अटक करण्यात आलेला ३३ वर्षीय व्यक्ती हा गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून बेरोजगार होता आणि दिवसातील जास्तीत जास्त काळ तो इंटरनेटवर व्यतित करत होता. इंटरनेटवर तो नेहमी आयसिस संदर्भात माहिती आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले होते.

First Published on July 14, 2016 3:44 pm

Web Title: maharashtra ats arrests man with alleged isis links
टॅग Isis