15 January 2021

News Flash

Maharashtra Bandh: मराठा समाजाच्या मागण्या काय?

Maharashtra Bandh: मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर सरकार गंभीर नसून चार वर्ष लोटूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही.

संग्रहित छायाचित्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असून कोणतेही गालबोट न लावता बंद यशस्वी करुया, असे आवाहन मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. या समाजाच्या मागण्या काय आहेत आणि त्यांचे नेमके म्हणणे काय याचा घेतलेला आढावा…

> मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर सरकार गंभीर नसून चार वर्ष लोटूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही.

> ढासळत्या कृषी अर्थव्यवस्थेत होणारी घुसमट ओळखून त्यावर उपाययोजना कराव्यात.

> तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे मराठा युवकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढावा.

> शिक्षण, रोजगार निर्मितीसाठी शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के सवलतीचा आदेश सरकारने काढला. पण महाविद्यालये हा आदेश मानत नसून यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. जिल्हास्तरावरील वसतीगृह उभारण्याच्या दिशेनेही पावले उचलण्यात आलेली नाही.

> अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज करुन वाट पाहणाऱ्या लाखो युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. मराठा युवक- युवतींना यापासून वंचित ठेवून सरकार काय साधू इच्छिते?.

> शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यामुद्द्यांवर सरकार अपयशी ठरली आहे.

> महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार उदासिन

> अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे.

> मराठा समाजाला आता आश्वासने नको असून सरकारने तातडीने मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा.

> मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवरील गुन्हे मागे घ्यावे.

> राज्य मागासवर्गीय आयोगाचे कामकाज जलदगतीने पूर्ण करावे.

> मराठा आरक्षणासाठी २९ युवकांनी बलिदान दिले असून त्यांच्या कुटुंबियांना मदत आणि नोकरी द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 7:07 am

Web Title: maharashtra bandh maratha kranti morcha demands why they are protesting
Next Stories
1 Maharashtra Bandh: ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये आज शाळा बंद; मुंबईतही अनेक शाळांना सुट्टी
2 सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
3 पावसाचे प्रमाण घटले
Just Now!
X