भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली. हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदाला डाव्या विचारांच्या संघटना तसेच संभाजी ब्रिगेटचा पाठिंबा आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात काय काय बंद राहाणार आहे जाणून घ्या.

LIVE : आज महाराष्ट्र बंद; ठाण्यात आंदोलनाचा जोर; रेल्वे वाहतूक तुर्तास सुरळीत

– मुंबईच्या डबेवाल्यांचा या बंदाला पाठिंबा असून, डबेवाल्यांच्या संघटनेने काम बंद ठेवले आहे.
– मुंबईतल्या शाळा सुरु आहेत पण, मुंबईसह राज्यातील शालेय बस न चालविण्याचा निर्णय स्कूल बस असोशिएशनने घेतला आहे.
– नाशिक, औरंगाबादमधील शाळांना सुट्टी
– वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसी बस सेवा बंद
– अहमदनगरला जिल्ह्यातील अकरा एसटी आगाराची वाहतूक बंद
– अमरावतीमध्ये सुरक्षेच्या कारणामुळे काही शाळांना सुट्टी
अकोला जिल्ह्यात एसटी सेवा ३ जानेवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद
– अकोला जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद
– टॅक्सी चालक आणि मालक, रिक्षाचालकांचा बंदला पाठिंबा आहे त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी टॅक्सी, रिक्षा बंद