Maharashtra HSC Result 2019 Date : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा (HSC) निकाल उद्या २८ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. अजूनही महाराष्ट्र बोर्डाने अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु हा निकाल उद्याच लागणार असल्याचे समजत आहे.  mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. यंदा नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.

येथे पाहा निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
and mahahsscboard.maharashtra.gov.in.

असा पाहा निकाल –

वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल