राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणंच यंदाही कोकण विभागानं अव्वल कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा ९६.१८ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात किंचित घसरण झाली असली तरी यंदा ‘कोकण एक्स्प्रेस’ सुस्साट धावली आहे. गेल्या वर्षी कोकण विभागाचा निकाल ९६.५६ टक्के इतका लागला होता.

दहावीचा राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्का घसरला आहे. निकाल ०.८२ टक्क्यांनी कमी लागला आहे. कोकण विभागानं ९६.१८ टक्क्यांसह अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. यंदाही राज्यातील मुलींनी निकालात बाजी मारली आहे. ९१.४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८६.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत, अशी माहिती गंगाधर म्हमाणे यांनी दिली. राज्यातील १६ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८५. ७२ टक्के लागला असून, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

कोकण- ९६.१८

कोल्हापूर – ९३.५९

पुणे – ९१.९५

मुंबई – ९०.०९

औरंगाबाद – ८८.१५

नाशिक – ८७.७६

लातूर – ८५.२२

अमरावती – ८४.९९

नागपूर – ८३.६७
निकाल पाहा:

http://www.mahresult.nic.in

http://www.maharashtraeducation.com

http://www.sscresult.mkcl.org

http://www.rediff.com/exams

knowyourresult.com
बीएसएनएल मोबाईलवरून mhssc (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा.

आयडीया, व्होडाफोन, टाटा डोकोमो, रिलायन्स, बीएसएनएल टेलेनॉर या कंपन्यांच्या मोबाईलवरून MAH10 (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवावा.