राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक घोषणा करण्यात आल्या. पण, अर्थसंकल्पाचे भाषण झाल्यानंतर एक घोषणा सदस्यांना ऐकायला मिळाली.. ती अशी.. “अर्थसंकल्पीय प्रकाशने सुटकेससह…” दोनदा झालेल्या या घोषणेने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

Maharashtra Budget 2020 : सुरेश भटांच्या ‘या’ खास ओळींनी अजित पवारांनी केला अर्थसंकल्पाचा शेवट

ही घोषणा केली विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी… ते म्हणाले, “सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशने सुटकेससह (आमदारांकडे बोट दाखवून त्यांनी सुटकेससह असं पुन्हा म्हटलं.) सन्माननीय सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे तळमजल्यावरील वितरण केंद्रावर करण्यात आलेली आहे. सदस्यांनी ही प्रकाशने वितरण केंद्रावरून घ्यावीत.”

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी काय?

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘सुटकेससह’ या शब्दाचा पुनर्उच्चार का केला, ते मात्र कळू शकलं नाही.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडून राज्याच्या विकासासाठी काय काय करण्यात येईल याबाबत स्पष्ट केले. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींनी त्यांनी अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात केली. त्यानंतर अर्थसंकल्पातील पहिला आणि दुसरा टप्पा अजित पवार यांनी विस्तारीत वाचून दाखवला. अखेर सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी सादर करून त्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट केला.