News Flash

निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ, जाणून घ्या कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय

कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठीकत निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस सरकारमधल्या जलयुक्त शिवारच्या चौकशीचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे.

आणखी काय काय निर्णय घेण्यात आले?

नव्याने निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयासाठी निर्माण केलेल्या १२८ पदांना कायम ठेवण्याचा निर्णय

नागपूर शहर व परिसरातील रेल्वे मार्गावर आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी.जी.मेट्रो ट्रेन सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता

डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे घेण्याचा निर्णय

कोविडमुळे सहकारी संस्थांतील महत्वाच्या विषयांच्या मंजुरीचे अधिकार संचालक मंडळाला दुरुस्ती करण्याचा निर्णय अधिनियमात सुधारणा

केंद्र शासन पुरस्कृत “अटल भूजल (अटल जल) योजना” राज्यात राबविण्यास मान्यता

मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या/अतिरिक्त शाखा यांना २० टक्के अनुदान देणे तसेच २० टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय

हे निर्णय आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 7:46 pm

Web Title: maharashtra cabinet increase in residential doctors scholarship by rs 10000 scj 81
Next Stories
1 “आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून, वेळीच….” – रुपाली चाकणकर
2 पंढरपूर : अतिवृष्टीमुळे चंद्रभागेच्या घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू
3 मोठी बातमी! जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार
Just Now!
X