News Flash

चंद्रपूरमध्ये पिकअप चालकाचं नियंत्रण सुटलं, अंगणात खेळणाऱ्या तीन चिमुकल्यांना चिरडलं

रात्री साडेनऊच्या सुमारास तिघं चिमुकले अंगणात खेळत असतानाच झाला अपघात...

अंगणात खेळणाऱ्या तीन चिमुकल्यांना नियंत्रण सुटलेल्या एका भरधाव पिकअप वाहनाने चिरडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. या अपघातात एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दोन गंभीर जखमी  आहेत.

ही घटना चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील आहे. भरधाव आलेल्या पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आष्टी-गोंडपिंपरी मार्गाला लागून पंढरी मेश्राम यांचे घर आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास अलेशा मेश्राम (७) अस्मित मेश्राम (१०) आणि माही रामटेके (१२ ) हे तिघे अंगणात खेळथ होते. त्याचवेळी मुख्य रस्ता सोडून एक भरधाव पिकअप गाडी घराच्या अंगणात घुसली आणि अंगणात खेळत असलेल्या अलेशा मेश्राम (७) अस्मित मेश्राम (१०) आणि माही रामटेके (१२ ) या तिघा चिमुकल्यांना चिरडलं.

घटनेनंतर अलेशाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच मृत्यू झाला. तर, दोघे अद्याप गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातप्रकणी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोंडपीपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:35 pm

Web Title: maharashtra chandrapur accident pickup driver crushed three childrens sas 89
Next Stories
1 राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या ९ हजार ५६६ वर
2 “…तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”, आईच्या निधनानंतर राजेश टोपेंनी केलं भावनिक ट्विट
3 गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकरांचा ओघ सुरू
Just Now!
X