News Flash

सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका – मुख्यमंत्री

जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर जबाबदारी नाही.

दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, करोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

– मी सांगितल्याप्रमाणे पाडव्याला सर्व धर्मांची प्रार्थना स्थळी उघडली.

– कार्तिकी यात्रेला गर्दी करु नका.

– सर्व सण संयमाने साजरे केले.

– उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली.

– सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला करोनाचा आकडा खाली आला.

– सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका.

– दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला.

– गर्दी वाढली तरी करोना मरणार नाही, वाढणार आहे.

– ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

– लशीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे.

– २४ ते २५ कोटी जनतेला लशीकरण करायची गरज आहे.

– लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही,

– जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोल लगावला.

– अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा, ही मी कळकळीची विनंती करतो.

– लस येईल तेव्हा येईल, करोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा.

– गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी टाळा, मास्क लावण विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच करोना टाळण्याचे उपाय आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 8:07 pm

Web Title: maharashtra chief minister uddhav thackeray address the state dmp 82
Next Stories
1 महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले – हसन मुश्रीफ
2 चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील विधानाचा भाजपाकडून तीव्र निषेध
3 पुन्हा लॉकडाऊन होणार? या प्रश्नावर अजित पवार म्हणतात….
Just Now!
X