News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार? जनतेशी साधणार संवाद

उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळयांचे लक्ष....

(संग्रहित छायाचित्र)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतील. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्येही लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात मुंबईतही करोना रुग्णांचा आलेख वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज काय बोलणार? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार होत्या. नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पण करोनाचा धोका वाढल्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई सर्वसामान्यांना लोकल ट्रेनची प्रतिक्षा आहे. महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. पण सर्वसामान्य पुरुष प्रवाशांना अद्यापी लोकल प्रवास खुला झालेला नाही. दिवाळीनंतर मुंबईतील वाढती करोना रुग्णसंख्या पाहता सर्वासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 2:37 pm

Web Title: maharashtra chief minister uddhav thackeray will address the state dmp 82
Next Stories
1 राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा; रझा अकादमीचं राज्यपालांना पत्र
2 रोहित पवार म्हणतात, ‘या’ व्यक्तीसोबत लाँग ड्राइव्हला जायला आवडेल
3 विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही; राज्यमंत्री तनपुरे यांची माहिती
Just Now!
X