News Flash

“जे औषध सापडल्याची बातमी आली, ते आपण दोन महिने आधीपासूनच वापरत आहोत”

राज्यातील जनतेला दिला विश्वास

राज्यात वाढत चाललेली करोना रुग्णसंख्या आणि लॉकडाउन शिथिलीकरण याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं होतं. अखेर ही प्रतीक्षा रविवारी संपली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व लॉकडाउनविषयी भाष्य केलं.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “रक्तदानाशी निगडित महत्त्वाचा विषय म्हणजे प्लाझा थेरपी. मार्चपासून करोनाचं संकट आल्यापासून आपण, जे जे शस्त्र मिळेल ते घेऊन करोनाशी लढत आहोत. मग लॉकडाउन असेल, लॉकडाउन. ट्रॅकिंग ट्रेसिंग असेल तेही करतो आहोत. चाचण्या वाढवत आहोत. चाचण्या वाढवल्यानंतर उपचार पद्धती आणि मी नक्की सांगेन, अभिमानाने सांगेन की, आपला महाराष्ट्र, आपली मुंबई, जे आपले डॉक्टर्स आहेत. जो आपला टास्क फोर्स आहे, उपचाराच्या बाबतीत जगाच्या बरोबरीनं आपण चाललेलो आहोत. एक सूत भर सुद्धा आपण जगाच्या पाठीमागे नाही. चोहीबाजूंनी आपली नजर आहे. कोणत्या देशात काय चाललं, या देशात काय चाललं. कोणते उपचार होत आहेत, कोणते औषधी आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मला मेसेज आलेले एक बातमी होती डेक्सामेथाझोन हे नवीन औषध सापडल्याची. मी टास्क फोर्सच्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले उद्धवजी हे औषध आपण गेल्या दोन महिन्यांपासून आवश्यकतेनुसार वापरत आहोत. मग प्लाझा थेरपी. मार्च एप्रिलपासून सुरू केली. आजपर्यंत दहा जणांवर आपण उपचार केले. त्यासाठी उद्यापासून कदाचित महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त प्लाझा थेरपीचा वापर करणारं राज्य असेल,” असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

“पंतप्रधानांनी ३० जूनपर्यंत हा लॉकडाउन जाहीर केलेला आहे. लॉकडाउन हा शब्द बाजूला ठेवा. लॉकडाउन उठणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत आहोत. एक एक गोष्ट सुरू करत आहोत. मिशन बिगीन अगेन करताना काळजीपूर्वक करत आहोत. धोका टळला आहे, अशा भ्रमात राहू नका. करोनापासून वाचण्यासाठी घरात रहा. अनावश्यक नाही, तर आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. तुम्हाला धोक्यापासून सावध करणं हे माझं कामच आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 2:11 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray address to people bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं उत्तर…
2 ३० जूननंतर लॉकडाउन उठणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं हे उत्तर…
3 Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करताना
Just Now!
X