03 March 2021

News Flash

अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार

जनतेशी साधला संवाद

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. करोना परिस्थिती आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. या संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांचा नामोल्लेख टाळत विरोधकांचा समाचार घेतला. “मागील महिन्यात २८ नोव्हेबरला सरकारनं एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या काळात अनेकजण डोळे लावून बसले होते,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”रहदारी सुरू झाली आहे. येणं जाणं सुरू झालं आहे. पण कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा सांगत राहणं हे माझं कर्तव्य आहे. मार्चपासून राज्यात करोनाचे रुग्ण दिसायला लागले. त्याची वाढ कशी झाली. याची आठवण करून देण्याचं कारण आता हिवाळा आलेला आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथी पसरल्या नाहीत. पण, आता रहदारी वाढल्यानंतर थंडीतील आजार दिसू लागले आहेत. यावर एकच उपाय आहे. मास्क लावणं, हात धुत राहणं आणि डिस्टन्स पाळणं,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

“आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा आहे. गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने… महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकास कामं केली,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 1:21 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray address to people uddhav thackeray facebook live bmh 90
Next Stories
1 लॉकडाउन, नाईट कर्फ्यूबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
2 किमान पुढचे सहा महिने मास्क वापरणं बंधनकारक – मुख्यमंत्री
3 संतोष पोळने माझ्यासमोरच तीन खून केले; ज्योती मांढरेची कोर्टात साक्ष
Just Now!
X