मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज काही मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. राज्यातील करोनाची स्थिती, सध्याची आर्थिक परिस्थिती, लॉकडाउनचं पुढचं स्वरुप याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यात काय स्थिती आहे? आरोग्य व्यवस्था कशी आहे याबाबत मंत्री चर्चा करतील, त्यांच्याकडे असलेली माहिती देतील अशीही शक्यता आहे. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्या करोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था कठीण झाली आहे. अनेक राज्यंही त्याला अपवाद नाहीत. महाराष्ट्राला या आर्थिक संकटातून कसं बाहेर काढायचं यावर या बैठकीत चर्चा होण्याची चिन्हं आहेत. तसंच महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नेमकी काय योजना आखायची यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

याआधी काही तज्ज्ञांन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आर्थिक चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही योजना सुचवल्या आहेत. त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मंत्र्यांशी चर्चा करु शकतात.