26 September 2020

News Flash

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री होते उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यानंतर आता मराठा आरक्षणाचं काय होणार? यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मंत्री उपस्थित होते. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाचं काय करायचं? यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे, विद्या चव्हाण, सचिन सावंत, भाई जगताप, अनिल परब आदींची उपस्थिती होती. मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश आणू शकतो, फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण संदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 7:28 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray held a high level meeting today after the supreme court stayed maratha reservation in the state scj 81
Next Stories
1 कोव्हिड १९ साहित्य चढ्या दराने विकणाऱ्या पुरवठादारांविरोधात फौजदारी गुन्हा
2 कोल्हापुरात दहा केंद्रात मोफत करोना चाचणी सुविधा
3 मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा, उदयनराजेंचा इशारा
Just Now!
X