मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये  विदर्भ, शेतकऱ्यांसंदर्भात  काही महत्वाच्या घोषणा केल्या.

– महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.

– गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी योजना सुरु होणार.

– मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

– समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार. कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागत होते. महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार.

– सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार

– कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.

– समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार.

– आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

– पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.