News Flash

‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं’

भाजपाच्या नेत्यापासून देशातील मुलीही सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. हे सरकार फक्त जाहिराती करते. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल केला.

अशोक चव्हाण ( संग्रहीत छायाचित्र )

काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या हातात देशाची सूत्रे जाणे हे देशाचे दुर्दैव असल्याचे सांगत केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं अशी सध्याची अवस्था असल्याची टीका केली. मिरज येथे महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा, नाणार प्रकल्पावरून अशोक चव्हाण यांची टीका

भाजपा म्हणजे भारत जलाओ पार्टी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाच्या नेत्यापासून देशातील मुलीही सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. हे सरकार फक्त जाहिराती करते. शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करत ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा दावा खोटा असून फडणवीस यांनी हे सिद्ध करून दाखवल्यास आम्ही निवडणुका सोडून देऊ असे आव्हान त्यांनी दिले.

पेट्रोल दरवाढीवरून त्यांना भाजपाला लक्ष्य केले. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल भाजपालाच करावा लागतोय.

दरम्यान, चव्हाण यांनी बुधवारी नाणार येथील नियोजित रिफायनरीविरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीतही भाजपा-शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा सुरू असल्याचे सांगत भाजपा कोकणातील लोकांच्या जीवावर उठल्याचा आरोप त्यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:11 pm

Web Title: maharashtra congress state president ashok chavan slams on bjp election campaign sangli miraj kupwad municipality election 2018
Next Stories
1 मुंबई हायकोर्टाने न्यायालयीन भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली; लाखो उमेदवारांना दिलासा
2 देहूरोडमध्ये टोळक्याचा धुडगूस; वाहनांची तोडफोड, २ महिलांनाही मारहाण
3 आदिवासी पाड्यातील मनसैनिकाच्या घरी जमिनीवर बसून जेवले राज ठाकरे
Just Now!
X